हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यातील पालकमंत्रिपदांच्या वाटपावरून महायुती सरकारमध्ये तणाव वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) रायगड आणि नाशिक या महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. आता मंगळवारी झालेल्या बैठकीत तर एकनाथ शिंदे यांनी अनुपस्थिती दाखवली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सध्या रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांवरून महायुतीत वाद सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हा संघर्ष टोकाला गेला आहे. या मुद्यावरून शिंदे गटाने देखील नाराजी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले.
पालकमंत्रिपदासाठी मंत्री अस्वस्थ
शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री व्हायचे होते, तर भरत गोगावले यांनी रायगडची जबाबदारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्याने शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या वर्चस्वामुळे त्यांना संधी न मिळाल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील हे महत्वाचे ठरणार आहे.