हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती. खुद्द काँग्रेसनेच ही ऑफर पवारांना दिली आहे असेही समजलं होत. दरम्यान खुद्द शरद पवारांनीच या बातमी मध्ये काही तथ्य नाही असं सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अस असूनही अजूनही पवारांच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातच आता समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी यांनीही शरद पवारच युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आमदार अबू आझमी म्हणाले की, शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावं अशी चर्चा आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी या मताचा आहे की, आजच्या तारखेला काँग्रेसची देशात जी परिस्थिती आहे ते पाहता शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करायला हवं. माझी अशी मनापासून इच्छा आहे.
या गोष्टी जाणूनबुजून पेरल्या जातायत – काँग्रेस
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी सांगितले की, पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याच्या चर्चेत काहीच तथ्य नाही. जाणूनबुजून अशा गोष्टी पेरल्या जात आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. पंरतु, वास्तवाशी या बातमीचा काहीच संबंध नाही. या बातमीत काहीच तथ्य नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’