औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक; सभागृहातच ‘मविआ सरकार’ वर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाची निवड झाली. भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांनी यात विजय मिळवल्या नंतर सर्व राजकीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुस्लिम नाव असलेल्या शहरांची नावे बदलून काय मिळणार आहे?,” असा सवाल अबू आझमींनी केला.

आज मतदानाला आम्ही तटस्थ राहिलो कारण जेव्हा जेव्हा आम्ही जवळ जातो तेव्हा तेव्हा आम्हाला धुडकारले जाते. आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता तरीही जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून टाकले. नाव बदलल्याने राज्याचा आणि देशाचा विकास होतो का?? विकास होत असले तर मला काही आक्षेप नाही मुस्लिमांची नावं बदलून काय संदेश दिला जात आहे.जुन्या शहरांची नावे बदलण्यापेक्षा नवीन शहरे तयार करा. बाळासाहेबांच्या नावे मोठ शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. पण मुस्लिमांची नावे बदलून काय म्हणायचे आहे?,” असा सवाल अबू आझमींनी केला.

Vidhansabha Adhiveshan Live | शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा

अबू आझमी यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून हा सवाल करताच शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी लगेच त्यांना प्रत्युत्तर दिले. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे,” असं भास्कर जाधव म्हणाले.

Leave a Comment