1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अबू बकर याला 29 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. लवकरच संयुक्त अरब अमिराती अबू बकर याला भारताकडे हस्तांतरित करणार आहे.

1993च्या बॉम्बस्फोटाचा अबू बकर हा मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीनुसार त्याला नुकतच पकडण्यात आल्याचं कळतंय. 2019मध्ये खरंतर बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली

अबू बकर याचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असून तो दाऊदच्या अगदी जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अबू बकरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण तसेच स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती येथे त्याचे वास्तव्य राहिलेले आहे.

Leave a Comment