कराड | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी अरोपीस 20 वर्षे सक्त मजूरी व 1 लाख 45 हजार रूपयाची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. महेश दादाराव मांजरे (वय- 30 वर्षे, रा. पोस्टल कॉलनी कार्वे नाका- कराड ता. कराड जि. सातारा, मुळ राहणार- भु-याच कवडगांव माजलगांव जि. बीड) या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाचे सहा. जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांनी ही माहिती दिली.
याबाबतची माहिती अशी, जून 2015 मध्ये पिडीत मुलगी हिची शाळा सुरू झालेपासुन मलकापूर शाळेबाहेर वारंवार येवून आरोपीने तु मला आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, तु माझ्याशी संबंध ठेवशील का? असे विचारून त्यास नकार दिलेने तु मला आता प्रेमसंबंध ठेवणेसाठी होकार दिला नाहीस तर मी तुला मारून टाकीन, तुझ्या घरच्यांची वाट लावीन व स्वतः जिव देईन अशी भिती व धमकी दिली. तसेच पिडीतेचे राहते घरी कोणी नसतांना गैरकृत्य करणेचे हेतूने जबरदस्तीने घरात घुसून तिचे इच्छेविरूध्द शारिरीक बलात्कार केला. दि. 30 मार्च 2016 रोजी जबरदस्तीने तिला निवस्त्र करून त्याचेसोबत आंघोळ करायला लावून तिचे अंगावर केवळ टॉवेल बांधून त्याचे मोबाईल फोनमध्ये तिचे संमतीशिवाय तिचे व त्याचे नग्न व अर्धनग्न अवस्थेत घाणेरडे फोटो काढून ते इतरांना दाखविले आहेत. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा कराड शहर पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आला आहे.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले. सदरच्या खटल्यात सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून तसेच वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकारी पी. व्ही. जाधव यांचे साक्षी, पिडीतेची साक्ष यावरून आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरून 20 वर्षे सक्त मजूरी व 1 लाख 45 हजार रूपयांची शिक्षा सुनावली. खटला दरम्यान सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करते वेळी व खटला चालविते वेळी अॅड ऐश्वर्या यादव, अॅड. संध्या चव्हाण, व अॅड कोमल लाड यांनी सहा. जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांना मदत केली. तसेच कोर्ट पैरवी प्रयुकेशन स्कॉड में कराड कोर्टातील कोर्ट डयुटीचे सहा. पोलिस फौजदार श्री. ए. के. मदने, पोलीस हवालदार श्री. जी. जी. माने यांनी सहकार्य केले.