अभाविपची महानगर कार्यकारिणी जाहीर

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या छात्रनेता संमेलनात शनिवारी महानगराचे नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महानगर अध्यक्षपदी प्रा. डॉ. योगिता पाटील यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी प्रा. गोपाल बल्लोच यांची निवड करण्यात आली. तसेच महानगर मंत्री पदी नागेश गलांडे यांची निवड केली.

एमजीएम विद्यापीठ कॅम्पस मधील आर्यभट्ट हॉलमध्ये झालेल्या या संमेलनात व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून अभाविपचे प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा प्रमुख डॉ. सुरेश मुंडे, महानगर मंत्री निकेतन कोठारी उपस्थित होते. डॉ. सुरेश मुंडे यांनी प्रास्ताविक केले. तर महानगर मंत्री निकेतन कोठारी यांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन ओमप्रकाश देवरे यांनी केले तर सुमेध मनुकर यांनी आभार मानले.

उर्वरित महानगर कार्यकारिणी –
सहमंत्री स्नेहा पारिक, ऋषिकेश केकान, दीपक टोणपे, संयोजक पृथ्वी तीलवलकर, व्यवस्था प्रमुख प्रा. गुरुबसप्पा करपे, सहव्यवस्था प्रमुख सुनील जाधव, सदस्य निकेतन कोठारी, उमाकांत पांचाळ, श्रीनाथ देशपांडे, अश्विन सुरवाडे आणि सचिन लांबुटे आदींची निवड करण्यात आली.