हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | AC Cooling उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हामध्ये आपण घरात बसताना देखील एसी, कुलर किंवा पंखा लावून बसत असतो. अनेक लोक हे उन्हाळ्यामध्ये एसी लावतात. परंतु काही लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांचा एसी जर कमी तापमानात ठेवला तर त्या एसीचा चांगला थंडावा मिळतो. परंतु ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांनी सांगितलेली आहे की, तुमचा एसी (AC Cooling) जर 24° वर सेट कराल, त्यावेळेस तो सगळ्यात चांगली कूलिंग हवा देईल.
एसीला वेळोवेळी सर्विसिंगची गरज | AC Cooling
जेव्हा आपण नवीन एसी खरेदी करतो. तेव्हा अनेक लोक असे सांगतात की, तुमच्या एसीला वर्षानुवर्ष सर्विसिंगची आवश्यकता लागत नाही. परंतु ही अफवा आहे. तुम्ही एकदा एसी घेतल्यावर वर्षावर तुमचा एसी सर्विसिंग करणे, खूप गरजेचे आहे. तुम्ही जर याची सर्विसिंग केली नाही, तर त्यातून चांगले कूलिंग मिळणार नाही.
हे केल्यास बिलावर होईल परिणाम
नेहमीच आपण असे म्हणतो की, जर आपण जास्त वेळ एसी चालू ठेवला, तर वीज बिल जास्त येते. त्यामुळे आपण एकदा रूम थंड करतो. आणि त्यानंतर एसी बंद करतो. परंतु जर तुम्हाला पूर्ण वेळ अशी चालू ठेवून कमी बिल हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तुम्हाला दर दोन आठवड्याने तुमचा एसीचा फिल्टर साफ करावा लागेल. यामुळे तुमचा एसी देखील चांगला चालेल. आणि तुमच्या बिलावर जास्त परिणाम होणार नाही.
अशाप्रकारे करा विजेचा वापर कमी | AC Cooling
एसी चालू असतानाही तुम्हाला विजेचे बिल कमी यावे असे वाटत असेल, तर तुमचा एसी वेळोवेळी फिल्टर साफ करणे खूप गरजेचे असते. या फिल्टरमध्ये घाण असल्यामुळे हवेचा प्रवाह कमी येतो. आणि तुमच्या एसीवरही जास्त दबाव येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातील एसीची कुलिंग सुधरवायची असेल, तर एका खोलीत एसी चालू करताना त्याचवेळी पंखा देखील चालू करा. तो मध्यम स्पीडने चालू करा. त्यामुळे तुमची खोली जलद गतीने थंड होईल.