हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AC Use Tips) उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात एसीचा वापर वाढलेला असतो. वाढती गरमी नाईलाजाने २४ तास एसी वापरायला भाग पाडते. त्यामुळे अनेक लोकांना लाईट बिल वाढल्याचा अनुभव येतो. म्हणून बरेच लोक कितीही उकाडा असला तरीही एसी वापरताना घाबरतात. अशा लोकांसाठी आज आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत त्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास एसी कितीही वापरला तरी लाईट बिल वाढणार नाही. चला तर वेळ न घालवता या टिप्स नेमक्या काय आहेत? त्याविषयी जाणून घेऊया
AC वापरताना ‘या’ टिप्स फॉलो करा (AC Use Tips)
1. एसीचा अधिक वापर केल्यामुळे वाढणारे लाईट बिल थांबवायचे असेल तर एसीच्या कुलिंगसाठी काही महत्वाच्या टिप्स फॉलो करा. यात एसीच्या योग्य कुलिंगसाठी तापमान नेहमी ठराविक क्रमांकावर सेट असेल याची खात्री करून घ्या. अनेकांना एसीचं कूलिंग फास्ट हवं म्हणून तापमान १८ ते २० वर करायची सवय असते. (AC Use Tips) ज्यामुळे साहजिकपणे लाईट बिल जास्त येतं. तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर बिल जास्त येऊ नये म्हणून एसीचं तापमान २५ वर सेट करून घ्या. यामुळे लाईट बिलावर परिणाम होत नाही.
2. उकाड्यात एसी चांगलं कुलिंग देत नाही अशी तुमची तक्रार असेल तर तुम्ही ज्या रूममध्ये एसी लावला असेल त्या रूममध्ये किती सामान आहे? याकडे लक्ष द्या. (AC Use Tips) रूममध्ये जितकं सामान कमी ठेवाल किंवा फर्निचर कमी ठेवाल तितकच जास्त आणि फास्ट कुलिंग होत हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या रूममध्ये एसी लावाल त्या रूममध्ये सामान कमी ठेवा.
3. एसी वापरताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, ज्या रूममध्ये एसी असेल त्या रूमचे खिडकी आणि दरवाजे यातून ऊन येणार नाही याची काळजी घ्या. कारण, असे झाल्यास एसीला कुलिंग करण्यासाठी जास्त श्रम पडतात. त्यामुळे तुमच्या लाईट बिलावर परिणाम होऊ शकतो. यासाठी तुमच्या खिडकी- दरवाजातून ऊन येऊन तुमची रूम गरम होणार नाही याची काळजी घ्या.
4. जर तुम्हाला एसीने लवकर कुलिंग द्यावं वाटत असेल तर त्याच तापमान १६ किंवा २८ करण्यापेक्षा खोलीतील पंखा सुरू ठेवा. पंखा सुरू असेल तर एसीची थंड हवा रूममध्ये फिरेल आणि लवकर कुलिंग होईल. (AC Use Tips) परिणामी अधिक वेळ एसी चालवावा लागणार नाही. शिवाय विज बिल देखील कमी येईल.
5. अनेक लोकांची तक्रार असते की एसी चांगलं कुलिंग देत नाही. शिवाय बराच वेळ एसी चालवून लाईट बिल वाढतं पण थंडावा मिळत नाही. अशा अनेक तक्रारींचे एकच कारण आहे. ते म्हणजे नियमित सर्व्हिसिंग न करणे. एसीच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी त्याचे नियमितपणे सर्व्हिसिंग करून घ्या. तसे न केल्यास एसीची कार्यक्षमता कमी होते आणि परिणामी एसी लवकर खराब होतात.
6. जर तुमचा एसी बराच वेळ चालू असूनही कुलिंग देत नसेल तर एकदा एसीमधून लिकेज तर नाही ना? याची खात्री करून घ्या. असे असल्यास एसी योग्य कुलिंग देणार नाही. शिवाय तुमच्या बिलातही झपाट्याने वाढ होईल. (AC Use Tips) त्यामुळे वेळीच लिकेजच्या समस्येकडे लक्ष देऊन सर्व्हिसिंग करून घ्या.