हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कडक उन्हापासून बचावासाठी अनेक जण एअर कंडिशनर (AC) चा वापर करतात. घरं, ऑफिस, मॉल्स, सगळीकडे AC च्या थंड हवेमुळे काहीसा आराम मिळतो. मात्र, हीच हवा तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकते, असा इशारा त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे. “एसीमधील थंड आणि कोरडी हवा त्वचेतील नैसर्गिक वॉटर बॅलेन्स बिघडवते. त्यामुळे त्वचा खेचल्यासारखी वाटते, कोरडी आणि रफ होते. केवळ ड्राय स्किनवाल्यांनाच नाही, तर ऑईली स्किन असलेल्या लोकांनाही ड्रायनेस जाणवू शकतो.”
त्वचेच्या आरोग्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या –
त्वचेच्या आरोग्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात – वॉटर बॅलेन्स आणि ऑईल बॅलेन्स. “ऑईली स्किन असलेल्या व्यक्तींचा ऑईल बॅलेन्स जास्त असतो, पण वॉटर बॅलेन्स कमी झाल्यास त्यांनाही कोरडेपणा जाणवतो.” जर तुम्हाला दीर्घकाळ AC मध्ये बसावं लागत असेल, तर तुमच्यासोबत नेहमी मॉइश्चरायझर ठेवा. दर काही वेळाने त्वचेला मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे.”
ह्युमिडिफायरचा वापरही फायदेशीर –
AC मुळे हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे त्वचेसाठी ह्युमिडिफायर वापरणं उपयुक्त ठरतं. AC फक्त त्वचेलाच नाही, तर संपूर्ण आरोग्यावरही परिणाम करतं. सतत थंड हवेत राहिल्यास डोळे कोरडे होणे, श्वसनाचे त्रास, अॅलर्जी अशा समस्या उद्भवू शकतात.
महत्वाचा सल्ला –
शक्यतो दीर्घकाळ AC मध्ये राहणं टाळा.
त्वचेसाठी नियमित मॉइश्चरायझर वापरा.
घरात किंवा ऑफिसमध्ये ह्युमिडिफायरचा वापर करा.
त्वचेतील बदल जाणवताच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
उन्हाळ्यात AC जरी आरामदायक वाटत असला, तरी त्याचा वापर विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्वचेसोबतच संपूर्ण आरोग्य टिकवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या.