Tuesday, January 31, 2023

 फडणवीसांना धक्का : एसीबीमार्फत जलयुक्त शिवारच्या कामाच्या चौकशीचे आदेश

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णय, राबविलेल्या योजनांची चौकशी करण्यास ठाकरे सरकारने सुरुवात केली आहे. त्यातील एक योजना म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी असलेली जलयुक्त शिवार योजनाही होय. या महत्वकांक्षी योजनेची चौकशी करण्याचे एसीबीने आज आदेश दिले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात 1100 जलयुक्त शिवारची कामे करीत योजना राबविली होती. यातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांना ठाकरे सरकारने निधी न देण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

जलयुक्त शिवार ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना होती. फडणवीसांनी राबविलेल्या जलयुक्त शिवारच्या कामातल्या गैरव्यवहारावर तीन चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या. जलयुक्त शिवारचा चालू वर्षाचा आराखडा 31 डिसेंबर 2019 रोजी संपला. जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ देण्यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यभरातल्या विभागीय आयुक्तांनी जलयुक्त शिवारच्या कामांना स्थगिती दिली आहे. राज्य सरकार आणि सामाजिक संस्थांनी मिळून जलयुक्तच्या सुमारे 99 हजार कामावर पाच हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे.