औरंगाबाद | शहरात तब्बल सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी दूध डेअरी येथील जागेतील जुने बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु हे काम संथगतीने सुरू होते. आता आठवडाभरात या जागेचे सपाटीकरण पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर भूमिपूजन होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली आहे.
दूध डेअरी येथील नियोजित २०० खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी जुने बांधकाम पाडण्याच्या कामाला वेग आला आहे. आठवडाभरात जागेचे सपाटीकरण पूर्ण होणार असून त्यानंतर भूमिपूजन होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
या जागेमध्ये मोठमोठ्या मशीन होत्या. तसेच जुने बांधकामात लोखंडी भाग होते. त्यासाठी गॅस वेल्डिंगची मदत घेतली जात होती. या कामासाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते. त्यामुळे काम संथगतीने सुरू होते. परंतु आता ऑक्सिजनची उपलब्धता झाल्याने 8 तारखेपर्यंत सपाटीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.