Monday, January 30, 2023

….म्हणून ‘ते’ पत्रं लिहिलं; प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर आघाडीत एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आपला पक्ष फोडत असून मोदींशी जुळवून घ्या अस पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होत. दरम्यान आता त्यांनी हे पत्र लिहिण्याचे नेमकं कारण सांगितले आहे.

जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं, असं सांगून प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे . आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं असे प्रताप सरनाईक यांनी म्हंटल.

- Advertisement -

अर्णब गोस्वामीने अलिबागची केस दाबली होती, त्यावर आवाज उठविला. कंगना राणौतने जे मुंबई पोलिसांवर वक्तव्य केले. या काळात मी पक्षाच्या प्रवक्ते पणाचे काम केले होते. गोस्वामीची केस पुन्हा बाहेर यावी यासाठी आवाज उठविला. कंगनाविरोधात मी विधानसभेत प्रस्ताव मांडला, त्यामुळे मी विरोधकांसाठी टार्गेट होतो असे ते म्हणाले. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.