ALTO गाडीला भरधाव दुचाकीस्वार धडकला अन् १० फुट उंच उडाला ; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

कुपवाड येथील भारत सुतगिरण ते माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. प्रकाश नानसो जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना हि शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

भारत सूतगिरणी ते यशवंतनगर रस्त्यावरून दुचाकीवरून दुचाकीस्वार प्रकाश नानासो जाधव हे यशवंतनगर कडे भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या अल्टो कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक एवढया जोरात होती की दुचाकीस्वार गाडीवरून उडून दहा ते पंधरा फूट लांब रस्त्याच्या कडेला पडला.तर दुचाकीचा पुढचा चक्का चुर झाला आहे.

त्याला तातडीने शासकीय दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरां कडून मयत घोषित करण्यात आले. रात्री उशीरा या अपघाताची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातातील दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment