दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजाचं दुःखद निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पंढरपूरवरुन आळंदीकडे येणाऱ्या नामदेव महाराजांच्या पालखी दिंडीला मंगळवारी सकाळी भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं. या अपघातात २ जण ठार, २ जण गंभीर जखमी तर १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दिवेघाटात झालेल्या या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास, वय ३६ हे जागीच ठार झाले आहेत. त्यांचे सहकारी अतुल महाराज आळशी, वय २४ यांनाही आपला जीव या अपघातात गमवावा लागला आहे. या अपघातात जेसीबीचंही मोठं नुकसान झालं आहे.

WhatsApp Image 2019-11-19 at 12.13.07 PM

दिवे घाटात जेसीबी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून दिंडीकरांवर शोककळा पसरली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी नामदेव महाराज पंढरपूरहुन येत होते. हीच परंपरा कायम ठेवत वारकरी दरवर्षी दिंडीमध्ये सहभागी होतात. मंगळवारी या दिंडीचा पुण्यात मुक्काम होता आणि बुधवारी अष्टमीच्या दिवशी आळंदीमध्ये दिंडीची सांगता होती. अचानक झालेल्या या अपघाताने वारकरी मंडळी हवालदिल झाली असून मुख्य वारकऱ्याच्या जाण्याचं दुःख समस्त बांधवांवर कोसळलं आहे.

WhatsApp Image 2019-11-19 at 12.13.07 PM (1).jpeg

सोपान महाराज यांच्यावर बुधवारी आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment