Accident News| छत्तीसगड (Chhattisgarh) येथील कावर्धामध्ये पिकअप वाहन उलटल्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या अपघातामध्ये 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी आणि मृत्यू झालेले सर्वजण आदिवासी समुदायाचे लोक आहेत. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 10 महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबद्दल संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर आता जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
भरधाव पिकअप 20 फूट खोल खड्ड्यात पडली (Accident News)
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बैगा आदिवासी समाजातील 25-30 कामगार तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून घरी परतत होते. मात्र प्रवासादरम्यान बहपनी परिसरात येताच त्यांची पिकअप 20 फूट खोल खड्ड्यात पडली. यामुळे ही पिकअप जागीच पलटली गेली. या अपघातामुळे 15 जणांना जागीच जीव जमवावा लागला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. यातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण कुई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हणले आहे की, “कावर्धा जिल्ह्यातून अत्यंत वेदनादायक अपघाताची माहिती मिळाली आहे. कावर्धा जिल्ह्यातील कुकडूर पोलीस स्टेशन परिसरात पिकअप गाडी उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तेंदूपत्ता तोडून सर्वजण जंगलातून घरी परतत होते. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”