Accident News | दसऱ्याच्या दिवशी नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; 6 लोकांसह स्विफ्ट नदीत कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Accident News | आज संपूर्ण देशात दसरा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आणि या दसऱ्याच्या दिवशी एक खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. ती म्हणजे नाशिकमध्ये एक मोठा अपघात झालेला आहे. हिंगोलीत नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झालेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु गाडीतील सगळे लोक सुरक्षित आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या येथे या स्विफ्ट गाडीचा अपघात झालेला आहे. स्विफ्ट डिझायनर कार कठडा नसल्याने थेट पुलावरून नदीमध्ये कोसळलेली आहे. हा अपघात कसा झाला आहे? याची माहिती अजूनही समोर आलेले नाही. परंतु कार खूप वेगाने होयी आणि ती नदीत कोसळली. कारमधील लोकांना बाहेर येणे देखील शक्य झाले नाही. परंतु त्यांनी जीव वाचवण्यासाठी खूप धडपड केली.

तेथील लोकांच्या स्विफ्ट कार नदीत कोसळण्याचे लक्ष्यात आले. आणि त्यांनी अगदी ताबडतोब सगळ्यांच्या मदतीने तिथे बचाव कार्य सुरू केले. तसेच पोलिसांना देखील माहिती कळवली हिंगोलीतील गावाला निघालेल्या निफाड मार्गावरच्या पुलावर ही घटना घडलेली आहे. या कारमध्ये एकूण सहा जण होते. कार पलटी होऊन पाण्यात बुडत होती. त्यामुळे त्यात अडकल्या लोकांना बाहेर देखील येता येत नव्हते.

तेथील ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी हे बचाव कार्य केले. आणि सहा जणांना कारमधून सुखरूप बाहेर काढले. गाडीवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे देखील म्हटले जात आहे. परंतु त्यांचे नशीब चांगले होते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यापैकी कोणाचीही जीवित हानी झाली नाही. फक्त कारचे नुकसान झालेले आहे.