Accident News| शुक्रवारी रात्री हरियाणातील नूह येथे धार्मिक यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये आगीत होळपळून तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये सुमारे 64 भाविक प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान बसमध्ये शॉर्टसर्किट झाले. ज्यामुळे संपूर्ण बसला आग लागली. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी प्रवासी बसच्या खिडक्या फोडून बाहेर पडले. (Accident News) परंतु ज्या प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती बसला आग लागल्याचे दुर्घटना घडली. ही आग 17 ते 18 मे च्या रात्री 1.30 च्या सुमारास लागली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासी लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. (Accident News) हे प्रवासी मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन पुन्हा आपल्या घरी परतत होते. परंतु घरी परतण्याच्यापूर्वीच या सर्व प्रवाशांवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे नूह मार्गावर गोंधळ उडाला होता. तसेच, वाहतूक खोळंबली होती.
महत्वाचे म्हणजे, बस लागल्याची माहिती मिळतात स्थानिक स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने ही आग भिजवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र या सर्व घटनेची माहिती पोलिसांना दिली असतानाही पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा आले, असे आरोप लावण्यात येत आहेत. सध्या या घटनेमुळे संबंधित प्रवाशांच्या कुटुंबावर सुखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसऱ्या बाजूला, सोशल मीडियावर ही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शॉर्टसर्किटमुळे बसला आग (Accident News)
प्राथमिक माहितीनुसार, या बसला शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागण्याचे समोर आले आहे. ही आज लागली असल्याची माहिती चालत आला आहे समजले नव्हती असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. जेव्हा ही बस थांबवण्यात आली तोपर्यंत बसमध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.