देवदर्शनाहून परतणाऱ्या कारची उभ्या ट्रकला महामार्गावर धडक : आई- मुलाचा जागीच मृत्यू

Accident Pune- Bangalore Road
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शन कोल्हापूरहून परतणाऱ्या कारच्या अपघातात मायलेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. महामार्गावर अनाधिकृतरित्या पानटपरीवर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची कारने धडक दिली. यामध्ये चारचाकी कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने देवदर्शन करून घरी परतणाऱ्या कार व उभ्या असलेल्या ट्रकचा अपघात झाला. कारने जोरदार पाठीमागून धडक दिल्याने कारमधील आई- मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाल्याने गाडीतील दोन्ही मृतदेह क्रेनच्या मदतीने बाहेर काढावे लागले.

कारमध्ये एकूण 7 जण होते, त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना शिरोळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.