WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?
ताज्या बातम्याबुलढाणा

नॅशनल हायवेवर भीषण अपघात ; १२ जण जागीच ठार

Untitled design
Untitled design

बुलढाणा प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलरापूर येथे भीषण अपघात झाल्याने १२ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मलकापूर येथे एका कारखान्याजवळ मालवाहू ट्रक आणि टाटा मॅजिक या दोन वाहनात हा अपघात झाला आहे.

आज सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टाटा मॅजिक या वाहनातील १२ जण जागीच ठार झाले असल्याची माहिती वार्ताहराकडून देण्यात आली आहे. गाडीमध्ये १२ प्रवासी होते. खरंतर चारचाकी असल्यामुळे १२ प्रवाशांची जागा नव्हती. पण जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले होते अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या अपघातामध्ये १२ प्रवाशांसह चालकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अपघात झाल्यामुळे हायवे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेली अपघाती वाहनं बाजुला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.तसेच सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

x Close

Like Us On Facebook

shares