सातारा – म्हसवड रस्त्यावर भीषण अपघात युवक ठार : चारचाकी पलटी तर दुचाकी जळून खाक
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- म्हसवड रोडवर चारचाकी आणि दुचाकीचा अपघात भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी पलटी झाली तर दुचाकीने घेतला पेट घेतल्यामुळे जळून खाक झाली. तर एक युवक ठार झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा-म्हसवड रस्त्यावर गोंदवले खुर्द नजीक स्विफ्ट कार आणि पल्सर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात माण तालुक्यातील पानवण येथील उमाजी आप्पा नरळे हा युवक ठार झाला आहे. या अपघातात दुचाकी वरील अजित नरळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.
आज मंगळवारी दि. 17 रोजी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. स्विफ्ट कार सातारा दिशेने निघाली असताना उमाजी आप्पा नरळे आणि अजित नरळे हे पल्सर वरून पानवनच्या दिशेने निघाले होते. दोन्ही गाड्यांचा भीषण अपघातात झाल्यानंतर कार रस्त्याकडेच्या शेतात जाऊन पलटी झाली. तर दुचाकी ही लांब फेकली गेल्यानंतर तिने पेट घेतला. घटनेनंतर दहिवडी पोलिस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त गाड्यांचा पंचनामा करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.