एसटीची सुरक्षा कठड्याला धडक; अपघातात महिला गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट नजीक दुचाकी आणि एसटीचा सोमवारी अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेने दुचाकी अचानक राष्ट्रीय महामार्गावर आणल्याने दुचाकीला वाचविण्याच्या नादात चालकाने एसटी महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकवली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सातारा-पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस कोल्हापूरच्या दिशेने जात जात होती. एसटी बॉम्बे रेस्टॉरंट लगत आली असता अचानकपणे सर्व्हिस रोडवरून जात असलेल्या एका महिलेने आपली दुचाकी क्रमांक ( एमएच ११ सी झेड ८०४७) हि महामार्गावर आणली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत दुचाकीवरील महिलेला वाचविले.

या अचानक घडलेल्या घडामोडीत तसेच महिलेला वाचविण्याच्या नादात एसटी चालकाने एसटी सर्विस रोडला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकवली. सुदैवाने बस मधील कोणालाही दुखापत झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुचाकीवरील महिला हि अपघातात जखमी झाली असून महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment