सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। ज्योतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापूरकडे परतत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एसटी बस चा अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घाडली आहे. या अपघातात ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी 3 बसेसद्वारे पन्हाळा, जोतिबा आणि कणेरी मठ या ठिकाणी सहलीसाठी या विद्यार्थिनी आल्या होत्या.

सांगली मधील विटा इथल्या इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेची शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. हि बस जोतिबाचे  दर्शन करून कोल्हापूरकडे परतत असताना दानेवाडी जवळ हा अपघात झाला आहे. नेमकं हि दुर्घटना का घडली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.  परंतु चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस  रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 सुदैवाने या दुर्घटनेत   जीवित हानी झाली नाही, मात्र एसटी बसचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने 108 च्या दोन रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave a Comment