खंबाटकी घाटात ओव्हरटेक करताना अपघात : पत्नी ठार, पती गंभीर जखमी

0
79
khambhatki Ghat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा | पुणे- बंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटातील एका वळणावर एसटीला ओव्हरटेक करण्याच्या नादात पती- पत्नी चाललेल्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पत्नी एसटीच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालविणारा पती गंभीर जखमी झाला. सविता संभाजी चव्हाण (वय 50, सध्या रा. पुणे मूळ रा. सातारारोड, पाडळी ता.कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून दुचाकीचालक संभाजी गुलाब चव्हाण (वय 60) असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले व मूळचे कोरेगाव तालुक्यातील संभाजी चव्हाण हे आपल्या पत्नी समवेत दुचाकी (एमएच-12-ईडी-8360) वरुन सातारारोड, पाडळी येथे निघाले होते. त्यावेळी दुचाकी खंबाटकी घाटात आली असता एका वळणावर स्वारगेटहून निघालेली एसटी (क्रं. एमएच-13-सीयू-8138) ही सातारा बाजूकडे जात असताना दुचाकीस्वार संभाजी चव्हाण हे डावीकडून अचानकपणे ओव्हरटेक करीत असताना दुचाकीच्या हँण्डलचा एसटीला धक्का लागला.

घाटात दुचाकी घसरुन एसटीच्या चाकाखाली गेल्याने दुचाकीवर पाठीमागे असलेल्या सविता चव्हाण या पडल्या. त्यांच्या डोक्यावरुन एसटीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक संभाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अधिक तपास पोलीस अंमलदार गिरीष भोईटे हे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here