ठरलं ! मराठा आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीची साथ, अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होणार उद्याच्या मोर्चात सहभागी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांची मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. उद्यापासून म्हणजे दिनांक 16 जून पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणार आहेत. त्याची सुरुवात कोल्हापुरातून केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर देखील हे या मूक मोर्चामध्ये उद्या सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

दरम्यान यापूर्वी देखील डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन संभाजीराजे यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये देखील डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी च्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” उद्या दिनांक 16 जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत ” अशा आशयाचे ट्विट वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण प्रश्नी वंचित बहुजन आघाडी आणि छत्रपती संभाजी महाराज एकत्र येणार का ? यावरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी खुद्द मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चामध्ये सहभागी होणार असं म्हटलं आहे.

उदयनराजेंचा पाठिंबा

दरम्यान, संभाजीराजे यांनी सोमवारी पुण्यात उदयनराजे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उदयनराजे यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही  उदयनराजेंनी दिला.’आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे. ‘संभाजीराजे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. पण आमचा मार्ग हा एकच आहे’ असंही उदयनराजेंनी  सांगितलं.

Leave a Comment