पोरीची छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची निर्घृणपणे हत्या

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील मानखुर्द या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयातून एका ६२ वर्षीय आचारीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटकोपर मानखुर्द लिंक रोड साठे नगरच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली फेकण्यात आला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर, मो. अख्तरआलम उर्फ सलीम याच्यासह त्याची पत्नी फिरोजा हिला अटक केली आहे.

रविवारी सकाळच्या सुमारास साठे नगर येथील उड्डाणपुलाच्या खाली एक मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर या मृतदेहाच्या अंगावरील जखमांवरून या व्यक्तीची हत्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो सगळीकडे व्हायरल केले. यानंतर मृतदेहाचा फोटो पाहून नंन्ने साबीर शेख यांनी मृत व्यक्ती त्यांचे सासरे असल्याचे सांगितले.

मृत व्यक्ती अब्दुल खलील शेख हे सलीम यांच्या घरात आचारी म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली पण त्या ठिकाणी सलीम आढळून आला नाही. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता सलीम हा पांजरपोळ परिसरात असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सलीमने शेखची हत्या केल्याची कबुली दिली. मुलीची छेड काढल्याच्या संशयातून सालिमने शेखला मारहाण केली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला. यानंतर सलीमने आपल्या पत्नीच्या मदतीने मानखुर्द परिसरात फेकले. यानंतर मानखुर्द पोलिसांनी आरोपीला अटक केली.