हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आचार्य भोसले तुषार भोसले यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम आहे कारण, या सरकारचे निर्माते असलेले पवार साहेबच बार धार्जिणे असल्याची जहरी टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
यासोबत ते म्हणाले की, “पवार साहेबांना हातावर पोट असलेले मजूर, लोककलावंतांची उपासमार, हाल-फुल विक्रेते, शेतकरी , मराठा आरक्षण हे काहीच दिसले नाही. त्यामुळे साहेबांनी दिखावा करू नये. एकीकडे मठ-मंदिरांची विजतोडणी करायची आणि बारचालकांना वीजबील सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाहीत”.
सरकारला आणि साहेबांना हफ्ते मिळतात म्हणुन बारचालकांसाठी वेगळे धोरण आखायचं आणि हातावर पोट असलेल्यांना कोणतीही सवलत द्यायची नाही, हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही याचा कडाडून विरोध करत असल्याची भूमिका यावेळी आचार्य तुषार भोसले यांनी मांडली.