धक्कादायक !!! तीन दलित बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला ; एकीची प्रकृती गंभीर

0
69
Acid Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये घडलेलं सामूहिक बलात्कार प्रकरण अजून ताज असतानाच आणखी एक महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये तीन दलित बहिणींवर अ‍ॅसिड फेकण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागिरकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गोंडा इथं हा भयंकर घटना घडली आहे. तिन्ही बहिणी रात्री झोपल्या असताना त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्यात आलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पीडित बहिणी या अल्पवयीन आहेत. घटना घडताच तिघींनाही स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

यातील दोन बहिणींची प्रकृती स्थिर असून एक बहिण मात्र गंभीर आहे. तिच्यावर जास्त अ‍ॅसिड पडल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here