औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा आरोप असलेले पीएचडी गाईड डॉ. गीता पाटील यांच्यावर तक्रार निवारण समितीच्या चौकशीनंतर कारवाई संदर्भात हालचाली करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले त्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बोलविण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठातील मानव व सामाजिक शास्त्रे विद्या शाखेचे तत्कालीन अधिष्ठाता तथा लोक प्रशासन विभागाचे प्रोफेसर डॉ. प्रशांत अमृतकर यांनी संशोधक विद्यार्थ्यांकडून मौखिक परीक्षेसाठी पैसे मागितल्याचा आरोप होता. त्यांच्यावरही सखोल चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्राथमिक चौकशी ते दोषी आढळले होते. त्यावेळी कुलगुरू प्रमोद येवले यांनी त्यांना तातडीने निलंबित करून त्यांचे गाईडशिप रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अमृतकर यांनी विद्यापीठ विरोधात खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेचा निकाल अमृतकर यांच्या बाजूने लागला. त्यांना तिन्ही पदावर पुन्हा नियुक्त करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. असाच आरोप इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. गीता पाटील यांच्यावर विदेशी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे. परंतु या घटनेला बरेच दिवस उलटूनही विद्यापीठ प्रशासनाने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही.
तक्रार निवारण समितीकडे दोन्ही प्रस्ताव पाठवून चौकशी करण्यात यावी. चौकशीनंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही चा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात यावा. असा निर्णय झाल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर फुलचंद सलामपुरे यांनी.