बगाड यात्रा भरवणाऱ्यावर लोकांच्यावर 144 नुसार कारवाई : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

व्हिडिओ पाहून तसेच स्थानिक पोलिसांचे जबाब घेणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रेत अंधाराचा फायदा घेऊन ज्या कोणी यात्रा भरवली. त्यांच्यावर व्हिडिओ पाहून तसेच स्थानिक पोलिस व तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांचे जबाब घेऊन जबाबदार असणाऱ्या लोकांच्यावर 144 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शास्त्र म्हणून केवळ पाच ते दहा माणसं आले असते. तर समजून घेतला असते. मात्र आजूबाजूच्या गावातील लोकही या यात्रेत सहभागी झाले होते. यापूर्वी लोकांना नोटिसा देऊन प्रशासनाने यात्रेबाबत सर्व माहिती दिली होती. तरीसुद्धा गर्दी जमा होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आमदार मकरंद पाटील म्हणाले, बावधन येथील ग्रामस्थ मला भेटायला आले होते. त्यांनी पन्नास लोकांची परवानगी मागितली होती‌. पारंपारिक पद्धतीने बगाड करणार होते, त्यासंदर्भात प्रांत व कलेक्टर यांच्याशी माझी चर्चा झाली. मात्र त्यांनी आम्ही चर्चा करतो असे सांगितले. आज जो काही प्रकार झाला त्याविषयी मला काही माहिती नाही. मात्र यात्रेत दहा ते बारा हजार लोक असतील असे मला वाटत नाही.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like