बैलगाडीवर कारवाई : शेतकऱ्यांची बैलांसह वडूज पोलिस ठाण्यावर धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वडूज | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला बंदी आणण्यात आलेली आहे. याबाबत काटेकोर पणाने अमलबजावणी करण्याचे धोरण पोलिस खात्याने आखले आहे. परंतु रविवारी सकाळी वाकेश्वर (ता. खटाव) येथे सराव करत असणाऱ्या शेतकऱ्यांवर अरेरावीची भाषा करत त्यांचे बैलगाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्याने तणावाचे वातावरण झाले. याबाबत माहिती मिळताच वाकेश्वरसह जिल्ह्यातील शेतकरी,बैलगाडी चालकांनी बैले घेऊन वडूज पोलीस स्टेशनवर धडक दिली. यावेळी शेकडो शेतकरी बैलगाडी चालक- मालक हजर होते. यादरम्यान वडूज पोलीस स्टेशनचे पोनि अशोक कदम यांच्याशी शिष्ठमंडळाने चर्चा केली व त्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शर्यत पारंपरिक असल्यामुळे निदान सरावासाठी वडूज पोलीस ठाण्याने परवानगी द्यावी, असे साकडे बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव संघटनेने दिले आहे. दि. 29 रोजी सकाळी नऊ वाजता काही शेतकरी बैल व गाडा घेऊन वाकेश्वर शिवारात आले असताना निनावी फोनमुळे वडूज पोलिसांनी बैलगाडी छकडा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. सदरची बाब बैलगाडा शर्यत शौकीनाना समजताच त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात आपल्या चार बैलासह धाव घेतली. परंतु पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने तिथेच ठिय्या आंदोलन केले.

वडूज पोलीस ठाण्यात नवीनच नियुक्ती झालेले पोनि अशोक कदम यांनी बैलगाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, शिवसेनेचे रंग कामगार संघटनेचे सरचिटणीस महेश फडतरे, माण-खटाव अध्यक्ष अतुल राऊत, विजय खवले, रवी फाळके, अनिल काटकर, सुयोग्य फडतरे, शरद पाटोळे यांच्याशी सकारात्मक चर्चा करून कोणावरही गुन्हा करण्याची वेळ येणार नाही. ज्यांचे छकडे आणले आहेत ते त्यांनी परत घेऊन जावे. कोणीही अफवा पसरू नये अशी विनंती केली. ती सर्वांनी मान्य करून याविषयावरती चांगला तोडगा काढला.