पुणे प्रतिनिधी । पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यापासून पुणेकर हेल्मेट सक्तीच्या विरोधामुळे तर दूसरी कडे वाहतूक पोलीस हे विना हेल्मेट दंड आकारण्याच्या कारवाही मुळे चर्चेचा विषय ठरलेत. मात्र आता चर्चा आहे, ती त्यांनी पोलीसांवरच कारवाही केल्याची. एका नेटीझन्सने ट्विटर वरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो ट्वीट करुन यांच्यावर कारवाही होईल का..? म्हणून प्रश्न विचारला असता त्यावर उपायुक्त सातपुते यांनी सदर नेटीझन्सला त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दंड आकारल्याची पावती ट्वीट करून, कायदा सर्वांसाठी सारखाच आहे हे दाखवून दिले.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते यांच्या ‘कायदा सर्वांसाठी समानच’ या भूमिकेचे नेटिझन्सने मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे.
नेटीझन्सने कारवाहीबाबत उपस्तिथ केलेला प्रश्न…
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) January 19, 2019
पोलीस कर्मचाऱ्यांवर दंड आकारल्याची पावती :-
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) January 19, 2019