ऑस्ट्रेलिया | वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली व अनुष्का शर्मा यांनी आज हजेरी लावली. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज रॉजर फेडररची मॅच पाहण्यासाठी विराट-अनुष्का जोडी आली होती. आज झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित रॉजर फेडररने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झ याचा ६-२, ७-५, ६-२ असा तीन सरळ सेट्समध्ये पराभव केला.
क्रिकेट-टेनिसचा ऋणानुबंध अधिक दृढ
रॉजरने त्यानंतर विराट व अनुष्का सोबत फोटोही काढला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवल्यानंतर लाडक्या टेनिस खेळाडूला भेटायला मिळाल्यामुळे विराट आनंदी होता. माझ्यासाठी हा दौरा खूपच अविस्मरणीय असल्याचं मत विराट कोहली याने ट्विटरवर व्यक्त केलं. सचिन तेंडुलकरनंतर विराटही रॉजर फेडररचा चाहता असल्याचं प्रेक्षकांनीही आज अनुभवलं.
इतर महत्वाचे –
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात