हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :नाशिकच्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत २२ रुग्ण दगावले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील संताप व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत बोलताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले,’ ही घटना दुर्दैवी आहे प्राथमिक माहितीनुसार 11 लोक मरण पावले आहेत हे आम्हाला कळले आहे. आम्ही सविस्तर अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही चौकशीचे आदेशही दिले आहेत जे जबाबदार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही” अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
It's an unfortunate incident. As per preliminary info, we've learnt that 11 people died. We're trying to get a detailed report. We've ordered an enquiry as well. Those who are responsible will not be spared: FDA Minister Dr Rajendra Shingane on Nashik Oxygen tanker leak incident pic.twitter.com/sT7M8XbatF
— ANI (@ANI) April 21, 2021
नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती 22 जणांचा मृत्यू
नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67असल्याची माहिती मिळत आहे .याबाबत नाशिकच्या महापालिका आयुक्तांच्या माहितीनुसार किमान १० ते ११ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते ते दगावले अशी माहिती मिळाली होती मात्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २२ रुग्ण दगावले असल्याची माहिती मिळाली आहे.
टॅंक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला होता. या दरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टॅंक हा 20 KL क्षमतेचा होता. या घटनेनंतर मात्र रुग्णालय परिसरात एकच धावपळ सुरू झाली. हॉस्पिटल प्रशासन या आपत्तीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र हॉस्पिटल मधील पेशंट सहित त्यांचे नातेवाईक हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत अशी माहिती मिळत आहे.
नाशिकमधील टँकच्या वाल्व गळतीमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. त्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे रुग्णालयात निश्चितच परिणाम झाला असावा परंतु अद्याप मी अधिक माहिती गोळा करीत आहे. अधिक माहिती गोळा केल्यानंतर आम्ही एक प्रेस नोट जारी करू अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.