‘चला हवा येउ द्या’ फेम भारत गणेशपुरे निवडणूक प्रचार मैदानात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी। सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. कोणी दिग्गज नेत्यांच्या सभा घेत्यात तर कोणी घरो घरी जाऊन भेटी गाठी घेतायत. आपल्या प्रचारासाठी जमेल ती युक्ती उमेदवारांकडून वापरण्यात येत आहे.

बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांना विजयी करण्याचे आवाहन करण्याकरिता मराठी विनोदी अभिनेते “चला हवा येउ द्या ” फेम भारत गणेशपुरे पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळालेत. रविवारी सकाळी अमरावती शहरातील साई नगर, गोपाळ नगर, गणेश कॉलनी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसह बंड यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेमधे मराठी सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी सहभागी होऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत प्रीतीताई बंड यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या मतदार संघात विद्यमान आमदार रवी राणा आणि प्रीती बंड यांच्यात लढत होणार आहे. ही जागा शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जवळ गेलेले रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणांची चांगलीच कोंडी झाली आहे. बडनेरा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केला, पण यात यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment