थापेबाजी करणारा ‘नराधम ‘माणूस’….मुख्यमंत्री शिंदेंवर किरण मानेंची जहरी टीका

eknath shinde kiran mane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराने (Badlapur Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी संतप्त मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय. या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्रातील वातावरण तापलं असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. चार महिन्यापुर्वी बलात्कार प्रकरणातील आरोपीला आम्ही फाशी दिली असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते, त्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.

याबाबत किरण माने यांनी इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा दाखला देण्यात आलाय. किरण माने म्हणाले, इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम ‘माणूस’ म्हणवुन घ्यायच्या लायकीचा आहे का??? असा संतप्त सवाल किरण माने यांनी केला आहे. किरण माने यांच्या टीकेला आता शिंदे गट नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे बघायला हवं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सडकून टीका केली. एकनाथ शिंदे हे एक नंबरचे खोटारडे आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगावं कि कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली? कोणत्या न्यायालयात हा फास्ट्रक्ट खटला चालला? कोणत्या न्यायालयात संबंधित आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात आरोपीला फाशी दिली याचा तपशील जाहीर करावा. फाशीची जागा कोणती ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं. वर्षा बंगल्यावर फाशी दिली कि राजभवनावर फाशी दिली हे एकनाथ शिंदे यांनी सांगावं असं आव्हान संजय राऊत यांनी दिले. एखाद्या राज्यामध्ये कोणाला फाशीची शिक्षा द्यायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते आणि आदेश काढावा लागतो. त्यामुळे राज्यपालांनी याबाबत काही नोंद असेल तर ती सांगावी असं संजय राऊत यांनी म्हंटल.