सातारा | मुलगी झाली हो या स्टार प्रवाह मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह समोर येवू लागले आहेत. किरण माने यांच्याकडून राजकीय पोस्ट केल्याने मालिकेतून काढल्याचे सांगण्यात येत होते. तर आज सकाळी महिलाच्या सोबत वर्तणूक चांगली नसल्याचे महिला कलाकारांनी सांगितले होते. मात्र सायंकाळी याच मालिकेतील काही महिला कलाकारांनी किरण माने यांची वागणूक कधीच गैर नसल्याचे म्हटले आहे.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. मात्र त्यांनी त्याचा त्यांनी राजकीय स्टंट म्हणून उपयोग करत पोस्ट व्हायरल केल्या आहेत. राजकीय पोस्ट करून दबाव निर्माण करण्याचा किरण माने प्रयत्न करत आहेत. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यात गूळुंब या गावात शूटिंग सुरळीत चालू असून शूटिंग बंद करण्यात आल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे कलाकार सांगत आहेत. किरण माने यांनी ग्रामपंचायतीचे लेटर घेऊन चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं असल्याचे लाईन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी सांगितलं होत. तर महिला कलाकार सविता मालपेकर, श्रावणी पिल्लई यांनीही किरण माने यांच्यावर महिलाच्यासोबत चुकीचे वर्तन करत असल्याचा आरोप केला होता.
किरण माने यांच्या या प्रकरणात महिला कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यामध्ये दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. तीन महिला कलाकारांनी सकाळी किरण माने याचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हटले होते. तर आता जवळपास 5 ते 6 महिलांनी किरण माने यांची वर्तन कधीच चुकीची किंवा आक्षेपार्ह नव्हती. तसेच किरण माने हे यांच्याबाबत जे काही चालले आहे, ते चुकीचेही असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता सकाळी महिलाच्यामुळे किरण माने अडचणीत येतील असे वाटत होते, मात्र सायंकाळी दुसऱ्या प्रतिक्रिया समोर आल्याने किरण माने यांच्यावर अन्याय झाला आहे असेही वाटू लागले आहे.