हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मधील अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाण हा तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. फौजीच्या जीवनावरील आधारित ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील अज्या आणि शीतलची जोडी छोट्या पडद्यावर हिट ठरली होती. मालिका बंद झाली असली तरी रसिकांच्या मनात आजही अज्या आणि शीतली वसलेले आहेत. या मालिकेतील अज्या अर्थातच नितीश आजकाल कुठे आहे काय करतोय या विषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावरील त्याच्या प्रत्येक अपडेटला त्याचे चाहते भरभरून लाईक, कमेंट आणि शेअर करीत असतात. त्याच्या बऱ्याच व्हिडीओमध्ये एक तरुणी नितीशसोबत कपल डान्स करताना दिसतेय. आता हि तरुणी नेमकी कोण? हि लोकांच्या लाडक्या अज्याची रिअल लाईफ शीतली तर नाही ना?
https://www.instagram.com/p/COmcOwIgt1c/?utm_source=ig_web_copy_link
नितीशच्या या डान्सिंग व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत दिसणारी हि सुंदर तरुणी कोण? याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये अत्यंत चर्चा रंगली आहे. नितीशसोबत दिसणारी ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री श्वेता खरात आहे. सध्या श्वेता ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत मोनाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती संजीवनीची जिवाभावाची मैत्रिण मोनीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिचे अत्यंत कौतुक होत आहे. अभिनेत्री श्वेता ही एक उत्तम अभिनेत्री आहे. पण त्याचसोबत ती खूप चांगली डान्सरसुद्धा आहे.
https://www.instagram.com/p/COcJocagnMU/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता खरात यांची फार जुनी मैत्री आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेचे चित्रिकरण देखील साताऱ्यातच होत होते. नितीश स्वतः साताऱ्याचा आहे. तर श्वेता खरातही मूळ साताऱ्याचीच आहे. सध्या दोघेही एकत्र डान्स करताचे व्हिडीओ चांगलेच वायरल होत आहेत. या दोघांनाही एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये अलगच चर्चा रंगात आली आहे.
https://www.instagram.com/p/CLTWSktJo-4/?utm_source=ig_web_copy_link
या दोघांचे नाते नक्की कोणत्या वळणावर वळतेय ह्याबाबत सोशल मीडियावरील चर्चांचा उधाण येत आहे.