सरकारला तर लाज वाटायला पाहिजे; गॅस दरवाढीवरून प्रकाश राज केंद्र सरकारवर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई झपाट्याने वाढत असून महागाई वर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरत आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्द्यावरून आता अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

“गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे” अशा आशयाचं ट्विट केलं असून सरकारला लाज वाटायला हवी असं म्हणत बोचरी टीका केली आहे. गेल्या तीन महिन्यांत 1 डिसेंबर, 1 जानेवारी, 4, 15, 25 फेब्रुवारी, 1 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात कशी वाढ झाली याबाबत माहिती त्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. एलपीजीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.

दरम्यान, देशात पुन्हा एकदा विनाअनुदानीत सिलिंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर 794 रूपयांवरून वाढून 819 रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलिंडरचे नवे दर 819 रूपये, कोलकात्यात 845.50 रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता 835 रूपये झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like