हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा टर्निंग पॉईंट (जीवन बदलवणारा क्षण) येतो की तिथून त्याच्या आयुष्याची गणितं बदलायला सुरुवात होते. मग ते शिक्षण क्षेत्र असुदे, मनोरंजन, व्यवसाय, क्रीडा किंवा इतर कोणतंही. भारतासारख्या देशात क्रिकेट आणि बॉलिवूड ही लोकांना प्राणप्रिय असलेली मनोरंजन साधनं आहेत. यात घडणाऱ्या घडामोडीसुद्धा लोकं लक्ष देऊन पाहत असतात.
आपल्या आयुष्यातील अशीच एक महत्त्वाची संधी गमावल्याची खंत अभिनेता राहुल रॉय याने व्यक्त केली आहे. डर या चित्रपटातील खलनायकाचं पात्र हे माझ्यासाठी लिहण्यात आलं होतं, मात्र कामाच्या व्यस्ततेत असल्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला नाही. त्यानंतर ही भूमिका शाहरुखला करायला मिळाली आणि तिथून पुढे शाहरुखने बॉलिवूड इंडस्ट्रीवर आपला वेगळा ठसा उमटवला असं राहुल रॉय म्हणाला.
द कपिल शर्मा शोमध्ये राहुल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आशिकी या चित्रपटानंतर राहुल यांना लगातार चित्रपटाच्या ऑफर्स येत गेल्या. आशिकीनंतर तब्बल ४९ चित्रपटांत राहुल रॉयने काम केलं. पण डर चित्रपट सोडल्याची खंत आजही वाटते असं राहुलने सांगितलं.
आशिकी चित्रपटानंतर राहुलच्या प्रेमात अनेक तरुणी होत्या. करीना कपूरनेही याचा खुलासा मागे एका कार्यक्रमात केला होता. राहुल हा माझा पहिला क्रश होता आणि त्याचा आशिकी चित्रपट थिएटरमध्ये ८ वेळा जाऊन पाहिल्याची कबुलीही करिनाने दिली होती.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.