हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता रजनीकांत यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तीव्र रक्तदाब असल्याचे आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रित होईपर्यंत आणि त्यांना डिस्चार्ज मिळेपर्यंत डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणार आहे
सुपरस्टार रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून हैदराबादमध्ये चित्रीकरण करत होते. 22 डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ती निगेटिव्ह आली असल्याची माहिती अपोलो रुग्णालयानं दिली आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे सध्या अन्नाथे या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्या चित्रपटाच्या सेटवरील 8 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 14 डिसेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’