‘थलैवा’ रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी, माळ्यालम, इंग्लिश, बंगाली अशा अनेक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटावणाऱ्या जेष्ठ अभिनेते रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शिवाजी द बॉस, बिल्ला, दळपती, चंद्रमुखी, बाशा,रोबोट, अशा अनेक चित्रपटातून ते लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत गजवत आहेत. एवढेच नाही तर सर्वाधिक मोठा चाहतावर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनीज बुक मध्ये त्यांचं नाव नोंदवले गेले आहे आहे.

२०००साली त्यांना भारत शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण, 2016 साली पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅन नंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे रजनिकांत हे कलाकार आहेत. दहा वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच,लेखक, निर्माता सहकलाकार अशा अनेक भूमिका बद्दल अनेक नामांकित पुरस्कार रजनीकांत यांना मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यात आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे.

मागील काही दिवसांपासून रजनीकांत राजकारणात येणार त्यामुळे मोठी चर्चा होती. मात्र त्यांनी राजकारणात येण्यास ही योग्य वेळ नाही असे सांगितले होते.त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मात्र त्यांच्या चहात्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे यात शंका नाही.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक

51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्यानंतर, अभिनेते रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत रजनिकांत यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,”पिढ्यान्पिढ्या लोकप्रिय असलेले , वेगवेगळ्या भूमिका सकरणारे आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व… ज्यांचा अभिमान बाळगू शकतात … रजनीकांत हे तुमच्यासाठी आहे. थलैवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन” अशा स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like