Thursday, February 2, 2023

रजनीकांत यांचा राजकारणाला रामराम; पक्षही केला विसर्जित

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज दक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणालाच पूर्णविराम दिला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, अस म्हणत त्यांनी आपला पक्षही विसर्जित केला. गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत यांच्या राजकीय हालचाली वरून अनेक राजकीय विश्लेषकांसह त्यांच्या चाहत्यांमधूनही अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र आता रजनीकांत यांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी सकाळी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करत राजकारणच्या दिशेनं सुरु केलेला प्रवास थांबवला आहे. भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असं देखील रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याची घोषणा करताना रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करुन ‘रजनीकांत रसीगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’ म्हणून काम करेल, असं जाहीर केलं आहे.