हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. पण कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. मात्र, आता रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर आतापर्यंत गर्लफ्रेंड आलिया भट्टशी मी लग्न केलं असतं, असं वक्तव्य अभिनेता रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं.
राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझी गर्लफ्रेंड आलिया हिने प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत इतरांपेक्षा जास्त यश संपादन केलंय. लॉकडाउनदरम्यान तिने गिटारपासून पटकथालेखनापर्यंत जवळपास सर्वच ऑनलाइन क्लासेस जॉइन केले होते. तिच्या तुलनेत मी काहीच संपादन केलं नाही, असं मला वाटतं. लॉकडाउनमध्ये सुरुवातीला माझ्या कुटुंबावर वडिलांच्या निधनाचं संकट आलं. त्यानंतर मी स्वत:ला वाचन करण्यात, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यात मग्न ठेवलं. दिवसाला दोन-तीन चित्रपटसुद्धा पाहायचो.” आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतो की, हा कोरोना व्हायरल आला नसता तर कदाचित आम्ही आतापर्यंत लग्न देखील केले असते.
रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’