अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठी कलाकारांच्या योगदानावर उठणाऱ्या प्रश्नांबाबत व्यक्त केली खंत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण देशात कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे औषधे, बेड्स, ऑक्सिजनच्या अभावी देशातील अनेक लोकांना कापला जीव गमवावा लागतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रीकरण असता अनेक कलाकार मंडळी विविध कामे करताना दिसत आहेत. एकीकडे संपूर्ण राज्यात अनेक लोक इतरांकडे मदतीच्या आशेने पाहत आहेत. दरम्यान हे कलाकार आपापल्या परीने शक्य तशी मदत करताना दिसत आहेत. यात मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. तरीही सर्वाधिक चर्चा मात्र बॉलिवूड कलाकारांचीच. या संदर्भात अभिनेता सिद्धार्थ जाधव याने खंत व्यक्त केली आहे.

बॉलिवूड जगतातील अनेक कलाकार एकीकडे कोरोना बाधित रुग्णांसाठी व कोरोना विरुद्ध लढ्यासाठी मदत करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मराठी कलाकारसुद्धा तितक्याच निस्वार्थ भावाने आपापल्या परीने मदत करण्यासाठी कोरोना काळात मैदानात उतरले आहेत. पण तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे खूप वाईट वाटते, असे म्हणत अभिनेता सिद्धार्थ जाधवने खंत व्यक्त केली आहे.

टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने यासंदर्भात आपले मन मोकळे केले आहे. यावेळी तो म्हणाला कि, माझे काही कलाकार मित्र मंडळी दिवस रात्र कोरोना काळात अविरत सेवा करत आहेत. कुणी कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करुन दिली आहे. तर कुणी रक्तदान करत आहे, कुणी जेवणाची सोय करत आहे.कोरोना काळात सोशल मीडियावर करोनाशी संबधित आलेली प्रत्येक माहिती पोस्ट करत आहेत. कुणाला बेड हवाय तर कुणाला ऑक्सिजन.

 

कुठे काय उपलब्ध आहे याची आमच्याकडे आलेली माहिती आम्ही चाहत्यांसोबत शेअर करत आहोत. जेणेकरून आमच्या एखाद्या पोस्टमुळे गरजूंना मदत होईल. मी स्वतः सोशल मीडियाचा वापर हा कोरोनाशी संबंधित पोस्टसाठी करत आहे. फक्त इतकेच की, आम्ही मराठी कलाकार आमच्या केलेल्या मदतीचा कुठेही गाजावाजा करत नाही. कोरोना काळातच नाहीतर याआधीही आलेल्या संकटात मराठी कलाकाराने कसलाही विचार न करता मदतीचा हात पुढे केला होता. ‘कोल्हापूरात आलेला पूर असो किंवा राज्यात येणारी संकट अशा अनेक वेळेला मराठी कलाकारांनी रस्त्यावर उतरून, गावोगावी जाऊन मदत केली आहे.

You might also like