अभिनेता सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक; अशी वाहिली श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकांनी सुशांतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांतच्या निधनाची बातमी समजल्यावर इस्रायलही भावूक झाला आहे. आम्ही सच्चा मित्र गमावला असल्याची भावना इस्रायलने व्यक्त केली आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमहासंचालक गिलाद कोहेन यांनी ट्विटरवर सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गिलाद यांनी सुशांतच्या ‘ड्राइव्ह’ चित्रपटातील मखना या गाण्याची लिंक शेअर करत त्याला आदरांजली वाहिली आहे. तसेच इस्रायलने सच्चा मित्र असलेल्या सुशांतसिंह राजपूतच्या निधनावर दु:ख व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे.

 

सुशांतची कायम आठवण येणार असल्याचं देखील ट्विटमध्ये म्हटलं आहे. इस्रायलमध्ये सुशांत आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्या एका गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सुशांत त्याच्या टीमसह तेथे गेला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Makhna - Drive| Sushant Singh Rajput, Jacqueline Fernandez| Tanishk Bagchi, Asees Kaur

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment