Monday, June 5, 2023

Breaking | उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी ; काँग्रेस सोडण्याचे सांगितले ‘हे’ कारण

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढून पराभूत झालेल्या सिनेअभिनेत्या उर्मिला मातोंडकरांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत आहे असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हणले आहे.

आपल्याला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसचे लोकच करत आहेत. मी यासंदर्भात काँग्रेस नेतृत्वाला पत्र देखील लिहले होते. मात्र मी ज्यांच्याबद्दल तक्रार केली होती. त्यांनाच पदे देऊन मोठे करण्याचा कार्यक्रम पक्ष नेतृत्वाने पद्धतशीर राभवला आहे असे उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस सोडताना म्हणले आहे. जरी आपण काँग्रेस सोडले असली तरी आपण लोकांचे काम करणे सोडले नाही आणि सोडणार देखील नाही असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत.

उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदाररसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांचा भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी पराभव केला होता. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांच्यावर गोपाळ शेट्टी यांनी केलेली टिप्पणी खूप गाजली होती. उर्मिला मातोंडकर माझ्या बहिणी समान आहेत. त्यांचा मी पराभव केला आता यापुढे काय बोलू असे गोपाळ शेट्टी म्हणाले होते.