दूरदर्शनच्या लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेक व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. एक दिवसापूर्वी लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचे देखील निधन झाले होते. त्यानंतर आता दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचेसुद्धा कोरोनाने निधन झाले आहे. उपचारादरम्याचं त्यांचा मृत्यू झाला.

कनुप्रिया या प्रसिद्ध अँकर तर होत्याच त्याबरोबर ते उत्तम अभिनेत्रीसुद्धा होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वी कनुप्रिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांची ऑक्सिजन लेवल बरीच कमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एक दिवस आधीच रोहित सरदाना यांचे निधन
लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचेदेखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीमध्ये अँकरचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी रोहित सरदाना यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

You might also like