हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खान नुकतीच झैद दरबार याच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. गौहर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. त्यामुळे ती नेहमीच पतीसोबतचे वेगवेगळे फोटो आणि मस्ती करतानाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने केलेल्या एका पोस्टवर अनेकांनी नेहमीप्रमाणे कमेंट्स केल्या आहेत. पण त्यातील एका युजरने हद्द पार करीत लिहिले इस्लामचा अर्थ वेगळ्याच दिशेला नेला आहे. मात्र गौहरने वेळीच त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/p/CPAMgmNH53E/?utm_source=ig_web_copy_link
गौहरने सोशल मीडियावर पती झैद दरबारसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ‘स्त्रियांवर पुरुषांचं वर्चस्व आणि पुरुषांच्या पायांजवळच स्त्रियांचं अस्तित्व म्हणजे खरा इस्लाम’, अशी कमेंट एका युजरने केली होती आणि तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर गौहरने या ट्रोलरची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
‘नाही मूर्ख माणसा, याला मैत्री, प्रेम आणि एकमेकांची साथ देणं म्हणतात. इस्लाममध्ये स्त्रियांचं वर्णन हे पुरुषांच्या अस्तित्वापेक्षा वरचढ किंवा त्यांच्या खाली नाही तर त्यांच्या बरोबरीने केलं आहे. त्यामुळे ती त्याच्या हृदयाजवळ राहू शकते. मूर्खासारखं काहीही बडबडण्याआधी शिका आणि गोष्टी नीट जाणून घ्या’, असे चपराक देणारे उत्तर गौहरने या ट्रोलरला दिले आहे.
https://www.instagram.com/p/CMTrFTpnma8/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांनी २५ डिसेंबर २०२० रोजी निकाह अर्थात विवाह केला. गौहरचा पती झैद दरबार हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. झैद हा एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. इतकेच नव्हे तर त्याचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे. गौहर खान एक प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने यश राज फिल्म्स च्या रॉकेट सिंग चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे.