अरे हे काय..? फक्त स्वेट शर्ट.. पॅन्ट कुठं गेली; क्युट लुकच्या नादात जैस्मिन झाली ट्रोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी ‘बिग बॉस सीजन १४’ मधील स्पर्धक जैस्मिन भसीन हीचा शोमधील क्युट आणि साहसी अंदाज लोकांना अत्यंत भावला होता. त्यानंतर जैस्मिन घराबाहेर आल्यानंतरही कायमच चर्चेत राहिली. ती नेहमीच तिचा बॉयफ्रेड अली गोनी याच्यासोबत दिसली आहे. दोघांची जोडी देखील प्रेक्षक खूपच पसंत करतात. मात्र यावेळी जैस्मिन भसीन अलीसोबत नाही तर तिच्या नव्या दोस्तासोबत स्पॉट झाली आहे. तिचा कुत्रा रॅम्बो याच्यासोबत कॉफीशॉपजवळ दिसली होती. यावेळी तिचा लूक पाहून अनेकांना हा प्रश्न पडला कि जैस्मिन पॅन्ट घालायला विसरली का काय..?

https://www.instagram.com/p/CPQSI2Gr0sz/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री जैस्मिन भसीनचा नवा सोबती तिचा पाळीव कुत्रा रॅम्बो आहे. जैस्मिनने सफेद रंगाचा एक सुंदर फरी डॉग घेतला आहे. या कुत्र्यासोबतच जैस्मिन गेल्या आठवड्यात जुहू येथे एका कोफी शॉपजवळ स्पॉट झाली होती. यावेळी तिने लाल रंगाचा एक सुंदर स्वेट शर्ट घातला होता. यासोबतच तिने काळ्या रंगाची छोटी शॉर्टस देखील घातली होती. पण झालं असं कि, तिची शॉर्ट्स इतकी छोटी होती की फोटोत दिसत देखील नाही आहे. त्यामुळे असं वाटत होतं की जैस्मिनने फक्त स्वेट शर्टचं घातलं आहे, पॅन्ट घातलीच नाही. पण काही म्हणा या लूकमध्येसुद्धा नेहमीप्रमाणेच ती क्युट दिसते आहे.

https://www.instagram.com/p/CPQdZfbDUzZ/?utm_source=ig_web_copy_link

जैस्मिन भसीनचा हा व्हिडीओ इतका वायरल झाला कि बस रे बस.. अनेकांनी तिला या ड्रेसिंग वरून ट्रोलसुद्धा केले. पण ट्रोलर्सपेक्षा तीच फॅन फॉलोईंग जास्त आहे. त्यामुळे ट्रोलर्सवर हे फॅन भारी पडले आहेत. या व्हिडिओत जैस्मिन गरीब मुलांशी अतिशय प्रेमाने बोलताना दिसत आहे. तिने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. यामुळे काही लोक तीच कौतुक करत आहेत. ट्रोलर्स काहीही म्हणू देत मात्र चाहते तीच नेहमीच कौतुक करत असतात. जैस्मिन आणि अली बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोन म्युझिक व्हिडिओत एकत्र दिसले. या दोघांची ‘सूट बडा टाइट’ आणि ‘तू भी सताया जाएगा…’ हि दोन्ही गाणी अगदी हिट ठरली.

Leave a Comment