महात्मा गांधी एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते ; कंगना पुन्हा बरळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत सतत आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने शेतकरी आंदोलन, बॉलीवूड मधील घराणे शाही यावर आपलं रोखठोख मत व्यक्त केलं आहे. आता मात्र तिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते अस कंगणा म्हणाली.

कंगणा राणावतने राणी एलिजाबेथ यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. जगावर राज्य करणारी महिला शासक म्हणून एकाचं व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या आदर्श पत्नी आणि बहीण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्या एक महान राणी आहेत, असं कंगणा राणावत म्हणाली आहे.

आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम केलं. मुलापेक्षाही मुलगी असूनही त्या पदावर चांगल्या प्रकारे काम केलं, असं कंगणाने म्हटलं आहे. तसेच  कंगणाने जग पुरुषांच्या चुका माफ करतं. महात्मा गांधींवर त्यांच्या मुलांनी वाईट आई-वडील असल्याचा आरोप केला होता, असं कंगणा राणावतने सांगितलं आहे

तसेच तिने पुन्हा ट्विट करत म्हंटले की, ‘महात्मा गांधी आपल्या पत्नीला घराबाहेर शौचालयाला जाण्यापासून नकार देण्यासाठी घराबाहेर काढायचे. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते, ‘ असं एका युजरच्या ट्विटला कंगणाने उत्तर दिले आहे. यामुळे आता कंगनाच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

You might also like